आयोजित करायलाच हवी अशी अद्वितीय कॉन्सर्ट

आपल्या आयुष्याचे नेतृत्व करायला शिका

विनर जीन कॉन्सर्ट
लव्ह युवर जिंदगी

मला फोन करा. तारीख आणि वेळ निश्चित करा. मी तुमच्या सेवेसाठी हजर राहीन.

माझा वास्तवावर विश्वास नाही... कारण ते सापेक्ष आहे.

माझा सत्यावर विश्वास आहे... कारण ते कालातीत आहे.

या सर्वाचा आरंभ नरक यातनांतून झाला आहे.

तुम्ही दारूवर प्रेम करा किंवा तिचा तिरस्कार करा... मद्यपाश आजार कोणाच्याही परिवारात गुपचूप शिरून पूर्ण परिवार उद्ध्वस्त करू शकतो.

एस. जी. नायक (साहिल दा)

कॉन्सर्टर.काउंसलर.क्लासिसिस्ट.

जीवन सुंदर आहे. जगणे ही स्वतःचे आयुष्य सुंदर बनवण्याची प्रक्रिया आहे. आणि... स्वतःच्या जीवनाचे सुशोभीकरण प्रत्येक दिवशी करायचे असते.

एस. जी. नायक (साहिल दा)

कॉन्सर्टर.काउंसलर.क्लासिसिस्ट.

प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेली पात्रता :
  • माझ्या कुटुंबातील एका मद्यपी सदस्यामुळे मी ३० वर्षे नरकयातना भोगल्या आहेत.
  • माझ्या यशस्वी समुपदेशन व आधारामुळे माझ्या कुटुंबातील सदस्याला मद्यपाशाच्या आजारातून मुक्त होण्यास मदत झाली.
  • मी लाईफ रिकव्हरी कौन्सिलर व आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून मद्यपीडितांना व त्यांच्या कुटुंबियांना यशस्वी सेवा देत आहे.
पूर्वी मिळवलेल्या पात्रता :

टॉप रँकर सिंगिंग : भारतीय सुगम संगीत (भारत सरकार मान्य भारतीय संगीत प्रसारक मंडळ स्था. १९३२)
हाय ऑनर म्युझिक टीचर : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (शंकर महादेवन अकादमी, भारत)
व्यावसायिक शिक्षण : ग्राफिक डिझायनिंग पदविका | वेब डिझायनिंग पदविका | मानसशास्त्र विद्यार्थी
धार्मिक शिक्षण : ऋग्वेद | आध्यात्मिक शिक्षण : पवित्र शास्त्र, सत्त्वाकर्षण क्रिया, केनॉटिक मेडिटेशन


सध्याची सेवा क्षेत्रे :
  • लाईफ रिव्हिलिंग कॉन्सर्ट : “लव्ह युअर जिंदगी” (मद्यपाश आजार आणि मद्यमुक्ती)
  • लाईफ रिकव्हरी कौन्सेलिंग : व्यसनमुक्ती, कौटुंबिक एकता, वैवाहिक जीवन, गर्ड्स , फियर , हाल्टस
  • आध्यात्मिक मार्गदर्शक: व्यक्तिगत मनःस्वास्थ्य | कौटुंबिक एकता | सामाजिक सलोखा | आध्यात्मिक एकरूपता |
  • लाईफ रिस्टोरेशन क्लासिक्स : पुस्तक लेखन – जीवनातील अपूर्णतेवर आधारित व्यावहारिक अध्यात्म, जे आनंदी जीवन जगण्यास सक्षम करते.
पूर्वीची कारकीर्द क्षेत्रे : (32 वर्षे)

लेखन, गायन, नाट्यकला, संकीर्तन, व्हॉइस आर्टिस्ट, वक्ता, संपादक (वृत्त), डिझायनिंग, आध्यात्मिक समुपदेशक, विपणन, जिंगल लेखक, कार्यक्रम संयोजक (इव्हेंट डिझायनर)

प्रोजेक्ट आर्क : विनर जीन कॉन्सर्ट

लव्ह युवर जिंदगी

मला कॉल करा. तारीख आणि वेळ ठरवा. मी तुमच्या सेवेत हजर असेन.

तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे...

तुमचा टाइम स्लॉट आत्ताच बुक करा

प्रोजेक्ट आर्क : लव्ह युवर जिंदगी चे अपेक्षित परिणाम

1) मद्यपाश म्हणजे शाप, पाप, पूर्वजन्म कर्म किंवा भूतबाधा आहे, या अंधश्रद्धा दूर करणे.
2) मद्यप्रेमींना मद्यपाशाच्या घातक स्वरूपाची जाणीव करून देणे.
3) मद्यपी नसलेल्या व्यक्तींना जाणीव करून देणे की, मद्यपाशाचा आजार कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात येऊ शकतो, मग ते मद्यपान करत असो वा नसो.
4) वैयक्तिक आरोग्य, कौटुंबिक ऐक्य, सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करणे.
5) पीडित मद्यपींना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदत घेण्यासाठी प्रेरित करणे. ही मदत मोफत आणि ऐच्छिक योगदान स्वरूपात उपलब्ध आहे.

प्रोजेक्ट आर्क : लव्ह युवर जिंदगी

विनर जीन कॉन्सर्ट मद्यपाश  आजाराबाबत सत्य, स्वरूप आणि त्यापासूनच स्वातंत्र्य यांची जाणीव निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. मद्यपाश हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वेगाने वाढणारा जीवघेणा आजार असून, तो 40% गुन्ह्यांसाठी आणि 200 हून अधिक आजारांसाठी मूळ कारण ठरतो. तसेच अमली पदार्थ सेवन, व्यभिचार, चोरी इत्यादी दुष्कृत्यांकडे प्रवृत्त करतो.

डडब्ल्यू एच ओ ने केलेल्या निरीक्षणानुसार 15 ते 25 वयोगटातील भारतीय युवावर्गात अति प्रमाणात मद्यपान केले जाते. मद्यपाश हा एक विकार असून अस्वस्थता आणि नकाराचा आजार आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे इतर आजारांच्या तुलनेत, मद्यपाश आजाराची लक्षणे गंभीर टप्प्यात पोहोचल्यानंतरच दिसून येतात.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, सर्व वयोगटातील पुरुषांमध्ये 65% आणि महिलांमध्ये 15% मृत्यू हे दारूमुळे होतात. मद्यपान करणाऱ्या प्रत्येक 100 पैकी 12-14 व्यक्ती मद्यासक्त होतात, कारण हा एक आजार आहे.
सामान्य दारू पिणाऱ्यांमध्ये कोण केंव्हा मद्यासक्त होईल हे कुणीही सांगू शकत नाही. ज्या कुटुंबात कधीच दारू पिली जात नाही अशा घरात सुद्धा मद्यपाश आजार प्रवेश करून सर्वनाश करू शकतो.

लव्ह युअर जिंदगी ही एक अशी अद्वितीय कॉन्सर्ट आहे, आहे जी मद्यपाश आजाराचे सत्य, स्वरूप आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवते.

तुमच्या लोकप्रिय संस्था, संघटना, उद्योग, आस्थापना, सोसायट्या, गट आणि कार्यालयांमध्ये ही अद्वितीय कॉन्सर्ट आयोजित करण्याची तुम्हाला विनंती आहे. मी सेवेसाठी तत्पर आहे.  क्लिक फॉर बुकिंग डिटेल्स ➡️ 

प्रोजेक्ट आर्क : विनर जीन कॉन्सर्ट ची रचना


शो  शीर्षक:
“लव्ह युवर जिंदगी”
शो कालावधी : 45 मिनिटे 
विषय: मद्यपाश आजार: सत्य, स्वरूप आणि स्वातंत्र्य

सुशोभन :  कविता, अनुभव, सत्य कथा, घटना व प्रसंग
आवश्यकता : प्रेक्षक, रंगमंच आणि प्रेक्षकांसाठी पुरेशी ध्वनी प्रणाली

लव्ह युअर जिंदगी चे बुकिंग कसे करायचे ?
मला कॉल करण्यासाठी स. 11 ते दु. 2 इथे क्लिक करा.

मला कॉल करा | सोमवार ते शुक्रवार दरम्यानचा  दिवस आणि तारीख निश्चित करा | योग्य वेळ ठरवा |
विनर जीन कॉन्सर्ट सादर करण्यास परवानगी देणारे अधिकृत पत्र द्या. मी तुमच्या सेवेसाठी हजर असेन.

मानधन / मोबदला 
(45 मिनिटांच्या विनर जीन कॉन्सर्ट चे बेसिक मानधन 7500 आहे)
प्रोजेक्ट आर्क अंतर्गत मी विशेष रकमेची मागणी करत नाही.
परंतु या कार्याला प्रोत्साहन म्हणून आपल्या तरतुदीनुसार आपण कॉन्सर्टचे मानधन देऊ शकता.
(प्रायोजक समर्थित आयोजकांसाठी मानधन रु. 36999 पासून पुढे – 90/120/150 मिनिट)

पुनर्वसित व्हा. पुनर्स्थापित व्हा. पुनर्जीवित व्हा.

चला, आपल्या आयुष्याचे नेतृत्व करायला शिका...

'विनर जीन' बना. 'विनर जीन' मानवी सक्षमीकरणासाठी समर्पित आहे..

भेदभाव नाही, अंधश्रद्धा नाही, दिखावा नाही.

शुद्ध सत्य. शुद्ध कृती. शुद्ध अनुभव.

कॉन्सर्ट्स । कौन्सेलिंग । क्लासिक्स


बुकिंगसाठी संपर्क: सकाळी 11 ते दुपारी 2 (सोमवार ते शुक्रवार)

विनर जीन फाउंडेशन,
सुरभी, कलानगर,
नाशिक 422009. महाराष्ट्र, भारत.

➜] ईमेल विनर जीन फाउंडेशन  :
winnergene.xyz@gmail.com

Winner Gene Foundation is thankful for Images courtesy by Pixabay, Vecteasy, Freepik, Pixel.

Scroll to Top