दारूपासून मुक्तता शक्य आहे.

निनांवीपणा हे आमचे मूळ तत्व आहे.

प्रोजेक्ट आर्क मध्ये आपले स्वागत आहे

विनर जीन फाऊंडेशन

आमच्या सेवा हे आमच्या प्रयत्नांचे, अन्वेषणाचे, प्रयोगांचे, अनुभवांचे आणि ज्ञानाचे फळ आहेत.

या सर्वाचा आरंभ नरक यातनांतून झाला आहे.

कॉन्सर्ट : लव्ह युवर जिंदगी

'आर्क' : अल्को-रिव्हिलेशन कॉन्सर्ट ही एक अद्वितीय प्रस्तुती आहे. या कॉन्सर्ट मध्ये मद्यपाश या आजाराचे नेमके स्वरूप आणि मद्यपाशापासून मुक्ततेसाठी उपाय सांगितले जातात.

ही कॉन्सर्ट सत्य, स्वरूप आणि 'स्वातंत्र्य' (मुक्तीचा मार्ग) यांचा वेध घेते. ही कॉन्सर्ट अनुभव आणि प्रबोधन यांनी समृद्ध आहे; तसेच ही कॉन्सर्ट कविता, कथा, विविध प्रसंग व खात्रीशीर उपायांसह आलेल्या सत्य अनुभवांनी सुंदररीत्या सजवली गेली आहे.

रचना, प्रक्रिया आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक द कॉन्सर्ट नाऊ" वर क्लिक करा.
प्रायोजक समर्थित आयोजकांसाठी प्रति कॉन्सर्ट मानधन फक्त 36,999 पासून सुरू

कौन्सेलिंग : लाईफ रिकव्हरी

आर्क - अल्को-रिकव्हरी कौन्सेलिंग सेवा, ज्यांना दारूपासून मुक्त होण्याची प्रामाणिक इच्छा आहे अशा मद्यपीडितांना व त्यांच्या परिवार सदस्यांना साहाय्य प्रदान करण्यासाठी आहेत.

हे कौन्सिलिंग सेशन्स पूर्णपणे गोपनीय असतात.

आमच्या सेवांचे मूलभूत आधार पुढीलप्रमाणे...
अनामिकता आमच्या सेवांचा पाया आहे.
कृती हा आमच्यासाठी जादुई शब्द आहे.
निःस्वार्थ प्रेम हे आमचे आनंद तत्व आहे.

सेवा, पद्धती आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक अपॉइंटमेंट नाऊ" वर क्लिक करा.

मानधन फक्त 369 प्रति सेशन पासून सुरु

क्लासिक्स : लाईफ रिस्टोरेशन

आर्क - ॲक्टिव्ह रिस्टोरेशन क्लासिक्स ही पुस्तके स्व-दास्यातून मुक्ती बाबत भाष्य करतात. स्व-दास्य एक असा तुरुंग आहे, जिथे बंधनांना स्वातंत्र्य समजले जाते. स्व-दास्य ही बाह्य बंधनांची गोष्ट नाही, तर नकळत बांधली गेलेली व स्वतःलाच कैद करून घेतलेली अशी बंदिशाळा आहे. दैनंदिन जीवन उत्साहाने जगता यावे हा या पुस्तकांचा हेतू आहे.

सोडून देण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. ही पुस्तके वैयक्तिक मनःस्वास्थ्य , कौटुंबिक ऐक्य, सामाजिक सलोखा, आध्यात्मिक अखंडता आणि जीवनाची पुनर्स्थापना यासाठी मूल्यवान आहेत. आपली प्रत आत्ताच आगाऊ नोंदवा.

मानधन प्रति प्रत ३६९ पासून सुरू

एस् जी नायक (साहिल दा)

कॉन्सर्टर । कौन्सेलर । कोच

जीवन सुंदर आहे. जगणे ही स्वतःचे जीवन सुंदर करण्याची प्रक्रिया आहे. आणि... स्वतःचे जीवन सुंदर करण्याची वेळ आज या दिवशी असते.

एस् जी नायक (साहिल दा)

कॉन्सर्टर । कौन्सेलर । कोच

प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेली पात्रता :

  • माझ्या कुटुंबातील एका मद्यपीडित सदस्यामुळे मी ३० वर्षे नरकयातना भोगल्या आहेत.
  • माझ्या यशस्वी कौन्सेलिंग व साहाय्यामुळे माझ्या कुटुंबातील मद्यपीडिताला मद्यपाशातून सावरण्यास मदत झाली.
  • मी लाईफ रिकव्हरी कौन्सेलर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून मद्यपीडितांना आणि त्यांच्या परिवार सदस्यांना यशस्वीपणे सेवा प्रदान करत आहे..

पूर्वी मिळवलेल्या पात्रता :

सांस्कृतिक : भारतीय सुगम गायन (टॉप रँकर) | हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत अध्यापक प्रमाणपत्र (उच्च सन्मानित अध्यापक)
व्यावसायिक : ग्राफिक डिझायनिंग / वेब डिझायनिंगमधील पदविका
धार्मिक : ऋग्वेद | सूक्ते  आध्यात्मिक : सत्त्वाकर्षण योग | केनोटिक मेडिटेशन
शैक्षणिक : मानसशास्त्राचा विद्यार्थी

सध्याची सेवा क्षेत्रे :

  • कॉन्सर्ट : “लव्ह युअर जिंदगी” (मद्यपाश आजार : सत्य, स्वरूप आणि स्वातंत्र्य)
  • लाईफ रिकव्हरी कौन्सेलिंग : मद्यमुक्ती, कौटुंबिक ऐक्य, वैवाहिक स्थिरता, गर्ड, फिअर, हाल्ट
  • स्पिरिच्युअल मेंटॉर : मानसिक आरोग्यपूर्णता | कौटुंबिक एकता | सामाजिक सलोखा | आध्यात्मिक एकात्मता |
  • लाईफ रेस्टोरेशन कोच : मद्यपाश आजाराने ग्रस्त मद्यपीडित आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवन पूर्ववत होण्यासाठी

मागील कारकिर्दीची क्षेत्रे : (32 वर्षे)

लेखन, गायन, नाट्यकला, संकीर्तन, व्हॉईस आर्टिस्ट, वक्ता, संपादक (वृत्त), डिझायनिंग, आध्यात्मिक समुपदेशक, मार्केटिंग, जिंगल लेखक, इव्हेंट डिझायनर

चला आरम्भ करूया... आताच संपर्क साधा

तुमचे जीवन अत्यंत मौल्यवान आहे.
तुम्ही अजून कनेक्ट नाही का झाला?

Winner Gene Foundation is thankful for Images courtesy by Pixabay, Vecteasy, Freepik, Pixel.

Scroll to Top